Company Name: | Shree Ashtavinayak Travels |
Year of Est.: | 1996 |
Nature Of Business: | Service provider, Tour Operator , Travel Agency |
त्रिस्थळी यात्रा दर्शन
वाराणसी(काशी) - गया - बुद्धगया - अयोध्या - प्रयाग - चित्रकूट - नैमिशारण्या..
यात्रा खर्च : प्रत्येकी ₹.२७,५००/- + रेल्वे खर्च..
यात्रा दिनांक : ०१ डिसेंबर ते १० डिसेंबर..
भारताची धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख दर्शवणारी काशी, गया, प्रयागराज, अयोध्या, नैमिषारण्य, आणि चित्रकूट ही ठिकाणे हिंदू धर्मातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी आहेत. या स्थळांचा प्रवास अध्यात्म, इतिहास, आणि निसर्गसौंदर्याचा अनुभव देतो.
१. काशी (वाराणसी)
• काशीला "मोक्षनगरी" म्हटले जाते. गंगा नदीच्या काठावर वसलेले हे शहर हिंदू धर्माचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे.
• काशी विश्वनाथ मंदिर: भगवान शिव यांना समर्पित १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक.
• गंगा घाट: दशाश्वमेध घाट, अस्सी घाट, मणिकर्णिका घाट..
• सत्यनारायण मंदिर, कालभैरव मंदिर, दुर्गामाता मंदिर, संकटमोचन हनुमान मंदिर..
विशेष अनुभव:
गंगा आरतीचा अद्भुत अनुभव.
घाटावर बोट सफर आणि अध्यात्मिक शांती.
२. विष्णु गय (गया)
• गया हे पिंडदान विधी आणि श्राद्धासाठी प्रसिद्ध आहे. याला हिंदू धर्मातील पवित्र तीर्थस्थान मानले जाते.
• विष्णुपद मंदिर: भगवान विष्णू यांचे पवित्र चरणांचे स्थान.
• फाल्गु नदी: पिंडदान विधीसाठी महत्त्वाची नदी.
• अक्षयवट: पवित्र वटवृक्ष, जिथे पिंडदान केले जाते..
विशेष अनुभव:
श्राद्ध विधींचे धार्मिक वातावरण अनुभवणे.
पवित्र ठिकाणी पूजा-अर्चा करणे.
३. बोधगया
• बोधगया हे बौद्ध धर्माचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे, जिथे भगवान बुद्धांनी ज्ञानप्राप्ती केली..
• महाबोधी मंदिर: यूनेस्को जागतिक वारसा स्थळ..
• बोधी वृक्ष: भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती मिळालेला पवित्र वृक्ष..
• बुद्धाची भव्य मूर्ती: शांततेचा संदेश देणारी मूर्ती..
विशेष अनुभव:
ध्यानधारणा आणि बौद्ध धर्माची शिकवण.
विविध देशांच्या बौद्ध मंदिरांची भेट.
४. प्रयागराज (अलाहाबाद)
• गंगा, यमुना, आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगमस्थळ असलेले तीर्थक्षेत्र.
• संगम: त्रिवेणी संगमस्थळी स्नान.
• हनुमान मंदिर: त्रिवेणी संगमाजवळील मंदिर.
• कुंभमेळा: जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव.
विशेष अनुभव:
स्नान आणि धार्मिक विधींचे आयोजन.
कुंभमेळ्याच्या वेळी लाखो भाविकांबरोबर सहभाग.
५. अयोध्या
• भगवान श्रीरामाची जन्मभूमी, हिंदू धर्मीयांसाठी पवित्र स्थान..
• रामजन्मभूमी मंदिर: श्रीरामाचा जन्मस्थळ.
• हनुमानगढी: भगवान हनुमानाचे मंदिर.
• शरयू नदी: धार्मिक स्नानासाठी प्रसिद्ध.
• कनक भवन: सीता-राम यांचे निवासस्थान..
विशेष अनुभव:
रामायणाशी निगडित स्थळांची भेट.
दीपोत्सवाचा प्रकाशमय अनुभव..
६. नैमिषारण्य (उत्तर प्रदेश)
• पुराणात वर्णन केलेले प्राचीन तीर्थक्षेत्र, जिथे ८८,००० ऋषींनी तप केले.
• चक्र तीर्थ: पवित्र जलकुंड.
• ललिता देवी मंदिर: ५१ शक्तिपीठांपैकी एक.
• हनुमान गढी: हनुमानाचे महत्त्वाचे स्थान.
विशेष अनुभव:
• वेद पठणाचे वातावरण अनुभवणे.
• चक्र तीर्थाजवळील शांतता अनुभवणे..
७. चित्रकूट
• रामायणातील महत्त्वाचे स्थळ, जिथे श्रीराम, सीता, आणि लक्ष्मण यांनी वनवासाचा काळ घालवला.
• कामदगिरी पर्वत: धार्मिक परिक्रमा स्थळ.
• गुप्त गोदावरी: गुहांमधून वाहणारी गोदावरी नदी.
• स्फटिक शिला: जिथे श्रीराम आणि सीता बसले होते..
• सती अनुसया मंदिर..
▪️धार्मिक तीर्थ: काशी, अयोध्या, आणि प्रयागराज ही हिंदू धर्मीयांसाठी महत्त्वाची स्थळे आहेत..
▪️आध्यात्मिक अनुभव: नैमिषारण्य, गया, आणि चित्रकूट येथे शांती आणि अध्यात्मिक उन्नती..
▪️ इतिहास आणि वारसा: बोधगया आणि प्रयागराज येथे सांस्कृतिक महत्त्वाचे स्थळ..
ही सात ठिकाणे धार्मिक, सांस्कृतिक, आणि ऐतिहासिक वारसा जपणारी आहेत, ज्यामुळे अध्यात्म आणि निसर्गसौंदर्याचा अद्वितीय अनुभव मिळतो.
✅ सहल खर्च समाविष्ट :
❎ सहल खर्च समाविष्ट नसेल :
आवश्यक कागदपत्रे
▪️मतदान कार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड अशी कोणतीही एक सरकारी ओळखपत्र..
!! श्री स्वामी समर्थ !!
"पशुपतिनाथाच्या कृपेतून, मुक्तीनाथाच्या चरणी… जानकीच्या नगरीतून बुद्धभूमीपर्यंत – एक अध्यात्मिक प्रवास!"
नेपाळ दर्शन यात्रा : काठमांडू, मुक्तिनाथ, पोखरा, जनकपूर, चितवन, लुंबिनी, गोरखपूर सह
🗓️ यात्रा सहल कालावधी : ५ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर
यात्रा सहल खर्च : प्रत्येकी ₹. ३८,५००/-( रेल्वे/ विमान तिकीट खर्च एक्सट्रा असेल..)
▪️मुख्य पर्यटन स्थळे:
🌆 काठमांडू (नेपाळची राजधानी)
• पशुपतिनाथ मंदिर
• डोलेश्वर महादेव मंदिर ( केदार को शीर )
• स्वयंभूनाथ
• बुढा नीलकंठ
• गुहेश्वरी शक्तिपीठ
🏔️ मुक्तिनाथ (हिंदू व बौद्ध धर्मीयांचे पवित्र स्थान)
• १०८ गोमुख धारा
• मुक्तिनाथ विष्णू मंदिर
• जोमसोम प्रवास (हवाई / जीप मार्गे)
🏞️ पोखरा
• फेवा लेक बोटिंग
• बाराही मंदिर
• गुप्तेश्वर गुहा
• डेव्हिड्स फॉल
• विंदवासिनी मंदिर
• मॉल रोड
🌸 जनकपूर
• जानकीमाता विवाह स्थळ
• जनकमहाल
🐘 चितवन
• जंगल सफारी
• थारू संस्कृती व फोक डान्स शो
• नॅशनल पार्क भेट
🪷 लुंबिनी
• भगवान गौतम बुद्धांचे
• जन्मस्थान
• मायादेवी मंदिर
• बुद्ध विहार व शांती स्थळे
🛕गोरखपूर
• गोरखनाथ मंदिर
• सोनोली बॉर्डर नेपाळ प्रवेश,
✅ सहल खर्च समाविष्ट :
▪️डबल / ट्रिपलं बेड आधारित रात्रीचे हॉटेल निवास व्यवस्था..
▪️वातानकुलीत २ x २ वाहनाद्वारे पर्यटन स्थळ प्रवास ..
▪️घरगुती जेवण व्यवस्था, किचन आणि आचारी बरोबर असणार..
▪️दररोज एक पाण्याची बॉटल..
▪️ प्रत्येक यात्रेकरूला एक टोपी आणि एक साईड बॅग..
▪️रेल्वे बुकिंग मिळण्यासाठी लवकर आपली सीट बुक करा..
❎ सहल खर्च समाविष्ट नसेल :
▪️ रेल्वे आणि विमान प्रवास खर्च..
▪️एन्ट्री फि, होडी, सफारी आणि दर्शन पावती खर्च अतिरिक्त असेल..
▪️सोबत पासपोर्ट / वोटिंग कार्ड आणी आधारकार्ड आवश्यक..
!! श्री स्वामी समर्थ !!
"जेथे हसणं मोजलं जातं, तेथून आनंद सुरू होतो – तेच भूतान!"
भूतान दर्शन..
फुंसालिंग - पारो - थिंपू - पुनाखा
सहल दिनांक : १० नोव्हें ते १७ नोव्हें
सहल खर्च : ₹. ६०,५००/- ( विमान तिकीट खर्चसहीत )
भूतान हे निसर्गसंपन्न, अध्यात्मिकतेने नटलेले आणि संस्कृतीने समृद्ध असे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. खाली तुमच्यासाठी भूतानची प्रमुख पर्यटन स्थळे, त्यांची थोडक्यात माहिती..
🇧🇹 भूतानची प्रमुख पर्यटन स्थळे व माहिती
1. थिंपू (Thimphu) – राजधानीचे
• भूतानची राजधानी.
• बुद्ध पाँईंट (Buddha Dordenma) हे एक भव्य बुद्धांचा पुतळा आहे.
• लोकसंस्कृती संग्रहालय (Folk Heritage Museum), मेमोरियल चोर्टेन आणि थिंपू झॉंग (Tashichho Dzong) ही प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
• स्थानिक बाजारात पारंपरिक हस्तकलेचे खरेदीसाठी योग्य ठिकाण..
2. पारो (Paro) – निसर्ग आणि आध्यात्माचा संगम
• पारो व्हॅली ही भूतानमधील सर्वात नयनरम्य ठिकाणांपैकी एक आहे.
• प्रसिद्ध टायगर्स नेस्ट मठ (Taktsang Monastery) हे डोंगरावर वसलेले भव्य तीर्थस्थान आहे.
• पारो झॉंग (Rinpung Dzong) आणि राष्ट्रीय संग्रहालय पाहण्यासारखी ठिकाणे आहेत.
• पारो येथे भूतानचे एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.
3. पुनाखा (Punakha) – ऐतिहासिक आणि हिरवे ठिकाण
• भूतानचे माजी राजधानी शहर.
• प्रसिद्ध पुनाखा झॉंग हा दोन नद्यांच्या संगमावर वसलेला प्राचीन राजवाडा.
• भव्य पुल – सस्पेन्शन ब्रिज आणि शांती देणारे वातावरण.
• शेती आणि नद्यांनी नटलेले सुंदर दृश्य..
4. फुंसालिंग (Phuentsholing) – भारत-भूतान प्रवेशद्वार
• भूतानमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रमुख शहर,
• भारतातील जयगाव शेजारी.
व्यापार व प्रवेशाचे केंद्र,
• शांततेने भरलेले शहर.
भारतातून भूतानमध्ये जाण्याचा सर्वात सोपा मार्ग..
चलतात ना मग सुंदर आनंदी, निसर्गरम्य "भूतान,.. पहायला..
( सहलीचा दिनवार तपशील पाहिजे असल्यास आम्हाला फोन करून मागून घ्या )
संपर्क साधा..
श्री अष्टविनायक ट्रॅव्हल्स..कल्याण..
9323780880, 7666725151, 9029080880..
सौराष्ट्र दर्शन : द्वारका - सोमनाथ - गिरनार तीर्थ - नागेश्वर - पोरबंदर - स्टेचु ऑफ युनिटी - अक्षरधाम - साबरमती आश्रम
यात्रा दिनांक : ३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर, ०४ जाने २६ ते १३ जाने २६
यात्रा खर्च प्रत्येकी : ₹. २४,५००/- फक्त + रेल्वे तिकीट एक्सट्रा..
सहलीचा दिनवार कार्यक्रम :
दिवस १ : कल्याण / मुंबई येथुन रात्री अहमदाबाद ट्रेनने अहमदाबादसाठी प्रयाण .
दिवस २ : सकाळी अहमदाबाद आगमन साबारमती स्थलदर्शन गांधीनगर अक्षरगधाम व मुक्काम . ( एकूण ९० किमी )
दिवस ३ : सकाळी लवकर द्वारका करिता प्रस्थान सायं ४ वा. द्वारका आगमन संध्याकाळी द्वारका धाम दर्शन करून हॉटेल मुक्काम...( एकूण ४५० किमी प्रवास )
दिवस ४ : द्वारका , बेटद्वारका , नागेश्वर , गोपीतलाव दर्शनोत्तर मुक्काम द्वारका . .( एकूण ६० किमी प्रवास )
दिवस ५ : द्वारका येथून प्रयाण , पोरबंदर दर्शनोत्तर सोमनाथ आगमन , ज्योतिर्लिग दर्शन व मुक्काम . .( एकूण २५० किमी प्रवास )
दिवस ६ : श्री सोमनाथ दर्शनोत्तर , जुनागढ प्रयाण , गिरनार पायथा आगमन व मुक्काम . .( एकूण १४० किमी प्रवास )
दिवस ७ : श्री गिरनार दर्शन व मुक्काम जुनागढ .
दिवस ८ : सकाळी लवकर जुनागढ येथून प्रयाण , वीरपूर स्थलदर्शनोत्तर बडोदा ( एकूण ३२० किमी प्रवास ) करिता प्रस्थान आगमन हॉटेल मुक्काम..
दिवस ९ : बडोदा येथून नास्ता करून स्टेचु ऑफ युनिटी करिता प्रस्थान सरदार वल्लभभाई पटेल, इतर म्युझिअम यांचं दर्शन करून रात्री १० वाजेपर्यंत बडोदा रेल्वे स्टेशन आगमन रात्री इंदोर पुणे एक्सप्रेस ने कल्याण करिता प्रस्थान..
दिवस १० : पहाटे ५ वाजता कल्याण येथे सुखरूप आगमन..
सहलीतील प्रेक्षणीय स्थळ :
अहमदाबाद - साबरमती आश्रम , अक्षरधाम , वैष्णोदेवी माता दर्शन .
द्वारका - चारधाम पैकी एक द्वारकाधीश मंदिर, बेट द्वारका - समुद्रातील छोटे बेट , द्वारकाधीश मंदिर, नागेश्वर - ज्योतिर्लिंग ,
पोरबंदर - सुदाम नगरी , म . गांधींचे जन्मस्थान , रोकडीया हनुमान मंदिर .
सोमनाथ - श्री सोरटी सोमनाथ मंदिर - ज्योतिर्लिंग प्रभासपाटण - हिरण्य , कपिला , सरस्वती नद्यांचा संगम . भल्लकतीर्थ - भिल्लाने मारलेला बाण श्रीकृष्णाचे पायास लागला येथेच ते निजधामास गेले . देहोत्सर्ग - सरस्वती नदीच्या काठी श्री कृष्णांनी आपला भौतिक देह विसर्जित केला .
गिरनार - श्रीदत्तात्रेयांच्या चरणपादुका , दहा हजार चढून जावे लागते ( रोपवे )
विरपूर - संत श्री जलारामबाप्पा समाधी ,
गरुडेश्वर - श्री , टेंबे स्वामी समाधी , नर्मदा दर्शन , श्रीदत्त मंदिर , गरुडेश्वर महादेव मंदिर , सरदार सरोवर ( नर्मदा नदीवरील धरण ) .
स्टॅच्यु ऑफ युनिटी - जगातील सर्वात उंच सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर ( ५९७ फुट ) पुतळा .
यात्रा खर्च समाविष्ट
▪️डबल / ट्रिपलं आधारावर रात्रीचे हॉटेल निवास.
▪️ग्रुपनुसार / योजनेनुसार योग्य २ × २ वाहनाद्वारे पर्यटन स्थळ प्रवास .
▪️कार्यक्रमानुसार सर्व जेवण समाविष्ट.
▪️कल्याण ते कल्याण टूर व्यवस्थापक.
▪️दररोज प्रति व्यक्ती 1 मिनरल पाण्याची बाटली.
यात्रा खर्च असमाविष्ट
▪️विमान भाडे वैयक्तिक कोणताही इतर खर्च.
▪️प्रवेश फी, रोपवे , स्टेचू ऑफ युनिटी प्रवेश फी अतिरिक्त प्रवास , लॉंड्री इतर खर्च.
▪️अतिरिक्त जीएसटी 5%.
▪️गिरनार येथे रोपवे / डोली शुल्क अतिरीक्त आकारले जातील.
आवश्यक कागदपत्रे
▪️मतदान कार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड अशी कोणतीही एक सरकारी ओळखपत्र.
पुर्वांचल दर्शन :
आसाम - मेघालय आणि अरुणाचल प्रदेश..
११ रात्री / १२ दिवस :
शिलाँग - काझीरंगा - दिरांग - तवांग - बोमडिला - गुवाहाटी
सहल यात्रा दिनांक : ९ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर
सहल यात्रा खर्च : प्रत्येकी ₹. ५०,५००/- फक्त..
दिवस १ : गुवाहाटी विमानतळ / रेल्वे स्टेशन - शिलाँग
गुवाहाटी विमानतळ/रेल्वे स्टेशनवरून पिकअप करून शिलाँगला प्रस्थान वाटेत उमियम तलाव बघुन शिलॉंग हॉटेलमध्ये चेक इन, शिलाँग येथे रात्रीचा मुक्काम..
दिवस २ : चेरापुंजी स्थळ दर्शन
सकाळ नाश्ता केल्यानंतर चेरापुंजी करिता प्रस्थान नोहकालिकाई धबधबा, मावसमाई स्थळ दर्शन करून, संध्याकाळी शिलाँगला परत, मार्गात एलिफंटाला भेट द्या. शिलाँग येथे रात्रीचा मुक्काम..
दिवस ३ : मेलेलॉंग व्हिलेज आणि दावकी
सकाळ नाश्ता केल्यानंतर मेलेलॉंग करिता प्रस्थान - रूट ब्रिज बघून नंतर भारत बांग्लादेश सीमेजवळील एक लहान शहर दावकीनदी ( उमंगोट) बघून संध्याकाळी शिलाँगला परत शिलाँग येथे रात्री मुक्काम..
दिवस ४ : शिलाँग प्रेक्षणीय स्थळ - काझीरंगा
सकाळी नास्ता करून डॉन बॉस्को संग्रहालय (रविवार बंद) आणि वॉर्ड लेकला भेट, नंतर काझीरंगाकडे गाडी आगमनावर हॉटेलमध्ये चेक इन, काझीरंगा येथे रात्रीचा मुक्काम..
दिवस ५ : काझीरंगा राष्ट्रीय उद्यान
पहाटे जीपने काझीरंगा नॅशनल पार्क सफारी गेंडा व्यतिरिक्त, इतर हॉग डीअर, स्वॅम्प डीअर, जंगली म्हैस, हत्ती या प्रजाती आढळतात आणि जर तुम्ही भाग्यवान असाल तर वाघ देखील. सफारी करून नाश्त्यासाठी. हॉटेलवर परत, रात्री सांस्कृतिक कार्यक्रम बघून येथे रात्रीचा मुक्काम काझीरंगा..
दिवस ६ : काझीरंगा ते दिरांग
सकाळी नास्ता करून हॉटेलमधून चेक आउट करून दिरांग करिता प्रस्थान, आगमनानंतर हॉटेलमध्ये चेक इन करा. दिरांग येथे रात्रीचा मुक्काम
दिवस ७ : दिरांग ते सेला पास मार्गे तवांग
सकाळी नाश्त्यानंतर, आम्ही तवांग करिता प्रस्थान वाटेत दिरांग मठ, सेला पास (13,700 फूट) येथील पॅराडाईज लेक स्थळ दर्शन आणि जशवंतगड युद्ध स्मारक दर्शन करून हॉटेलमध्ये आगमन झाल्यावर, तवांग येथे रात्रभर मुक्काम..
दिवस ८: तवांग प्रेक्षणीय स्थळ..
सकाळी नास्ता करून तवांगमधील स्थानिक प्रेक्षणीय स्थळांचा दौरा तवांग गोम्पा, द वॉर स्मारक ( मेमोरियल ), बुमला पास, माधुरी लेकला स्थळ दर्शन करून येथे रात्रभर मुक्काम सायंकाळी शॉपिंग करून तवांग येथे रात्रीचा मुक्काम..
दिवस ९ : तवांग - बोमडिला
सकाळी नाश्त्यानंतर बोमडिला कडे प्रस्थान, वाटेत जुन्ग येथील नुरानंग वॉटर फॉल्स बघुन बोमडिला येथे रात्रीचा मुक्काम..
दिवस १० : बोमडिला - गुवाहाटी
सकाळी नास्ता करून हॉटेलमधून चेक आउट आणि गुवाहाटी प्रस्थान, हॉटेलमध्ये चेक इन रात्रीचा मुक्काम गुवाहाटी.
दिवस ११ : गुवाहाटी स्थळ दर्शन
गुवाहाटी स्थळ दर्शन कामाख्या मंदिर, इतर दर्शन करून गुवाहाटी येथे रात्रभर मुक्काम
दिवस १२ : गुवाहाटी विमानतळ / रेल्वे स्टेशन
सकाळी नास्ता करून हॉटेलमधून चेक आउट आणि गुवाहाटी विमानतळ / रेल्वे स्टेशनवर आगमन मुंबई करिता प्रस्थान..
✅ सहल खर्च समाविष्ट :
▪️डबल / ट्रिपलं बेड आधारित रात्रीचे हॉटेल निवास व्यवस्था..
▪️वातानकुलीत २ x २ वाहनाद्वारे पर्यटन स्थळ प्रवास ..
▪️घरगुती जेवण व्यवस्था, किचन आणि आचारी बरोबर असणार..
▪️दररोज एक पाण्याची बॉटल..
▪️ प्रत्येक यात्रेकरूला एक टोपी आणि एक साईड बॅग..
▪️रेल्वे बुकिंग मिळण्यासाठी लवकर आपली सीट बुक करा..
❎ सहल खर्च समाविष्ट नसेल :
▪️ रेल्वे आणि विमान प्रवास खर्च..
▪️एन्ट्री फि, होडी, सफारी आणि दर्शन पावती खर्च अतिरिक्त असेल..
अधिक माहिती साठी संपर्क साधा..
श्री अष्टविनायक ट्रॅव्हल्स..
कल्याण..
9323780880, 7666725151, 9029080880.
DUBAI / ABUDHABI :
Tour Date : 3 Nov to 8 Nov
Tour Expense :
Day 01 - Pickup From Abu Dhabi Airport Transfer To Hotel Departure from Mumbai Airport @ 6.00 pm .Arrival at Abu Dhabi Airport @7.50 pm. Transfer to Hotel.
Day 02 - Evening At Desert Safari For those familiar with the Tales of The Arabian Nights, it is sort of a life time experience. In ways more than one, the expedition relives the legendary fables of Arabia. The Desert Safari is the singular event that packages the mystique of Arabia to its entirety.As the sun starts glancing obliquely again, our 4x4 ¬fleet, with our safari guides at the helms, embarks on the journey to unravel the mysteries of the scorching bed of the ocean of yore, the awe-inspiring silence of the desert interrupted only by the clicking of the cameras, once the roar of the vehicles comes to a halt. The Programme Includes :- Red Sand Dune Bashing in 4 x 4 Land Cruiser Camel Riding Sunset in the Desert Arabian costumes for photographs Unlimited soft drinks, Tea & Coffee Henna Painting BBQ Buffet dinner (Veg & Non Veg)Belly Dance Show Tanora Dance Show Don't forget to carry your Cameras to capture the unforgettable moments while short staying in our Camp
Day 03 - Dubai City Tour + Dubai Frame + Evening Marina Dhow Cruise With Dinner Dubai is the city of wonder, elegant and trendy developments and futuristic infrastructure of the city makes it a haven of tourism, it is entertaining and educative. While on the tour you get a chance to visit the best attractions of Dubai. It is the opportunity to view the natural as well as manmade wonders of Dubai and admire its craftsmanship closely very much giving a feast to your eyes. Get ready for a Sightseeing Tour Dubai to see breathtaking sights The Programme Includes :- Dubai Creek Dubai Museum Jumeirah Mosque Jumeirah Beach Burj Al Arab Atlantis The Palm Gold Souk & Spice market Visit Museum of future Photoshop Sheikh Zayed Road Evening 06 Pm Marina Cruise Welcome Drinks Two hours cruising on Dubai Marina Continental & Indian Buffet Dinner Unlimited Soft drinks Unlimited Soft Drinks & Juices Tanora Dance Fully Air Conditioned lower deck Open-Air upper deck Arabic / English & Hindi background music Enjoy a continental feast of International and Indian dinner onboard while our inhouse DJ plays entertaining music. We invite you to this amazing experience and promise you will never forget our Dhow Cruise Dinner.
Day 04 - Miracle Garden + Dubai Mall + Fountain + Burj Khalifa 124 Floor Access to the garden with its stunning floral displays. The opportunity to explore themed gardens and admire floral sculptures. Well-maintained walking paths and seating areas for relaxation. Photo opportunities among the vibrant blooms.Access to facilities such as restrooms, food outlets, and souvenir shops. Burj Khalifa 124th Floor 07 pm slot + Aquarium (outside) + Dubai Mall
Day 05 - Shopping + Evening at Global Village Time for Shopping. After Lunch proceed towards Global Village : Exhibition & Sale of All emirates cities under one roof.
Day 6 - Abu Dhabi City Tour + Grand Mosque + Ferrari Mall Photostop+ Baps Temple Visit + Drop To Airport The sightseeing tour to the capital of UAE is thought provoking and entertaining. Abu Dhabi is a city that boasts wonderful architecture and natural sceneries especially in the marina and cornice areas. Abu Dhabi has so much to offer, enjoy your city tour and emerge as enlightened as possible about the rich cultural and historical background of the city. THE PROGRAMME INCLUDES: BAPS Temple Visit To Sheikh Zayed Mosque Ferrari Mall Photostop Dates Market Drive through Corniche with Drive through Emirates Palace Hotel
INCLUSION :
EXCLUSION :
इंदोर - उज्जैन - ओंकारेश्वर - महेश्वरी - ग्वाल्हेर - झाँसी - ओरछा - खजूराहो - बांधवगड - जबलपूर - बेडाघाट आणि पंचमडी..
यात्रा सहल दिनांक : २२ डिसें ते ०३ जाने
यात्रा सहल खर्च : प्रत्येकी ₹. ३९,५००/- फक्त
मध्य प्रदेश पर्यटन –
मध्य प्रदेश हे भारताच्या हृदयस्थानी वसलेले राज्य असून, इतिहास, संस्कृती, निसर्ग, वन्यजीवन आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम येथे पाहायला मिळतो. या राज्याला “भारताचे हृदय” असेही म्हटले जाते.
🏞️ प्रमुख पर्यटन स्थळे व त्यांची वैशिष्ट्ये :
🏛️ इंदौर :
मध्यप्रदेशमधील सर्वात मोठे शहर.
लालबाग पॅलेस, सेंट्रल म्युझियम, राजवाडा आणि कांच मंदिर ही खास आकर्षणं..
🔱 उज्जैन :
एक प्राचीन धार्मिक शहर.
महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, काळभैरव मंदिर आणि संध्या आरती प्रसिद्ध.
कुंभमेळा हे जगातील सर्वात मोठं धार्मिक मेळाव्याचं स्थळ..
🕉️ ओंकारेश्वर :
१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक.
नर्मदा नदीच्या बेटावर वसलेलं हे ठिकाण अध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं.
🕊️ सांची :
बौद्ध धर्माचं प्राचीन केंद्र.
सम्राट अशोकाच्या काळातील सांची स्तूप, युनेस्को जागतिक वारसा स्थळ..
🖌️ भीमबेटका :
आदिमानव काळातील भित्तीचित्रे.
जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित..
🏯 ग्वाल्हेर :
ग्वाल्हेर किल्ला, तानसेन समाधी, जयविलास पॅलेस ही ऐतिहासिक ठिकाणं..
🕌 ओरछा :
जहांगीर महाल, लक्ष्मी नारायण मंदिर, चतुर्भुज मंदिर.
मध्ययुगीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना..
🛡️ झाँसी :
राणी लक्ष्मीबाईंचा पराक्रमी किल्ला.
इतिहासप्रेमींसाठी प्रेरणास्थान.
🛕 खजुराहो :
जगप्रसिद्ध शृंगारिक शिल्पकला असलेली मंदिरे.
युनेस्को विश्व वारसा स्थळ..
🌳 बांधवगड राष्ट्रीय उद्यान :
वाघसहित विविध वन्य प्राणी.
वन्यजीवन निरीक्षणासाठी उत्तम ठिकाण..
🌊 जबलपूर :
नर्मदा नदी भेड़ाघाट, संगमरवरी दगड, धुंधार धबधबा – निसर्ग सौंदर्याचं प्रतिक.
🌄 पचमढी :
मध्य प्रदेशमधील एकमेव हिल स्टेशन.
पांडव गुहा, जटाशंकर गुहा, सनसेट पॉइंट, बी फॉल्स.
"शौर्य, साधना, निसर्गरम्य जंगलसौंदर्य – मध्य प्रदेशाच्या प्रत्येक ठिकाणी एक कथा!"
📌 अतिरिक्त टिप:
मध्य प्रदेशमध्ये पर्यटनासाठी ऑक्टोबर ते मार्च या महिन्यांत प्रवास करणे अधिक अनुकूल ठरते, कारण हवामान आल्हाददायक असते.
✅ सहल खर्च समाविष्ट :
❎ सहल खर्च समाविष्ट नसेल :
अधिक माहिती साठी संपर्क साधा..
श्री अष्टविनायक ट्रॅव्हल्स..कल्याण..
9323780880, 7666725151, 9029080880.
!! श्री स्वामी समर्थ !!
केरळ दर्शन : कन्याकुमारी - रामेश्वर आणि मदुराई सह
मुन्नार - थेकडी - एल्लपी - त्रिवेंद्रम - कोवलम - कोचीन
सहल यात्रा दिनांक : १० डिसेंबर ते २१ डिसेंबर
सहल यात्रा खर्च : प्रत्येकी ₹. ३५,५००/- फक्त..
🌴 केरळ आणि दक्षिण भारत पर्यटन..
*🔱 १. रामेश्वरम् (Rameshwaram):*
• भारतातील चारधामांपैकी एक पवित्र तीर्थस्थान.
• प्रभू श्रीरामांनी येथे शिवलिंगाची स्थापना केली होती.
• रामनाथस्वामी मंदिर, अग्नि तीर्थ, धनुषकोडी ही प्रमुख स्थळे.
• समुद्र किनाऱ्याजवळील शांत आणि अध्यात्मिक वातावरण..
🌅 २. कन्याकुमारी (Kanyakumari):
•भारताचा दक्षिण टोकाचा भाग – जिथे अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर एकत्र येतात.
• स्वामी विवेकानंद स्मारक, तिरुवल्लुवर पुतळा, सूर्यास्त व सूर्योदयाचे अद्भुत दृश्य.
• समुद्रकिनाऱ्यावर संथ लाटा आणि सौंदर्यपूर्ण निसर्ग..
🛕 ३. मदुराई (Madurai):
मीनाक्षी अम्मन मंदिर हे दक्षिण भारतातील एक भव्य आणि कलात्मक मंदिर.
• प्राचीन इतिहास आणि धार्मिक महत्त्व असलेले शहर.
🌇 ४. त्रिवेंद्रम (Thiruvananthapuram):*
• केरळची राजधानी.
• पद्मनाभस्वामी मंदिर – जगातील सर्वात श्रीमंत देवस्थानांपैकी एक.
• म्युझियम्स, नॅपियर म्युझियम, शास्त्रगृह, झूलॉजिकल पार्क.
• पारंपरिक संस्कृती व आधुनिक शहरजीवन यांचा मिलाफ.
🏖️ कोवलम
प्रसिद्ध स्वच्छ समुद्रकिनारा म्हणून ओळखला जातो
• सनबाथिंग, अॅयुर्वेदिक मसाज, आणि शांततामय समुद्र दर्शन.
• कोवलम बीच, लाइटहाऊस बीच, हावाह बीच येथे पर्यटकांची वर्दळ..
🏞️ ६. मुन्नार (Munnar):
• पर्वतीय भाग व चहा बागांचे शहर.
• धुक्याने वेढलेले डोंगर, निसर्ग सौंदर्य, आणि शांतता.
• एराविकुलम नॅशनल पार्क, मट्टुपेट्टी डॅम, टी म्युझियम ही मुख्य आकर्षणं.
• हनीमून व वीकेंड ट्रिपसाठी उत्तम ठिकाण.
🚣 ७. एल्लेप्पी (Alleppey / Alappuzha):
• केरळची "व्हेनिस ऑफ द ईस्ट" म्हणून ओळख.
• बॅकवॉटर बोट हाऊस सफारी – पर्यटकांसाठी खास आकर्षण.
• नारळ groves, सुंदर नद्या, आणि पारंपरिक आयुर्वेदिक उपचार केंद्र.
🐘 ८. थेकडी (Thekkady):
• पेरियार वाइल्डलाईफ सॅंक्च्युरी – हत्ती, वाघ, पक्ष्यांचं निवासस्थान.
• मसाल्यांची शेती.
• निसर्गप्रेमी आणि साहसप्रेमींसाठी स्वर्ग..
🌉 ९. कोचीन (Cochin / Kochi):
• ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेले शहर.
• डच पॅलेस, ज्यूइश सिनेगॉग, चिनी मासेमारी जाळं, फोर्ट कोचीन.
• प्राचीन पोर्तुगीज व ब्रिटिश वास्तूंचा संगम..
✅ एकूण वैशिष्ट्ये:
▪️निसर्ग सौंदर्य, अध्यात्म, संस्कृती, आणि इतिहासाचा अद्भुत संगम.
▪️बोट सफारी, चहा बागा, समुद्रकिनारे, आणि मसाल्यांची शेती ही खास वैशिष्ट्यं.
"देवांची भूमी" केरळ हे पर्यटकांसाठी निसर्ग आणि शांततेचं आगार आहे.
त्रियोगी यात्रा : पिठापूर - कुरवपूर - श्रीशैल्यम - हैद्राबाद आणि रामोजी फिल्मसिटी
यात्रा दिनांक : २४ नोव्हेंबर ते १ डिसेंबर
यात्रा खर्च : प्रत्येकी ₹. २३.५००/- फक्त
दिवस १ : सकाळी ७.४५ वाजता एक्सप्रेसने सामलकोट करिता प्रस्थान,
दिवस २ : सकाळी ८.२० वा पिठापूर आगमन रिक्षाने टेक्सीने पिठापूर हॉटेल आगमन नास्ता / जेवण करून पिठापुर करिता प्रस्थान श्रीपाद वल्लभ मंदिर दर्शन, इतर मंदिर दर्शन करून रात्री हॉटेल मुक्काम,
दिवस ३ : सकाळी नास्ता करून पिठापुर व इतर मंदिर दर्शन करून सायंकाळी सामलकोट रेल्वे स्टेशन आगमन सायं ७ वा गोदावरी एक्सप्रेसने हैद्राबाद करिता प्रस्थान,
दिवस ४ : सकाळी हैद्राबाद आगमन हॉटेल चेकइन नास्ता करून हैद्राबाद स्थळ दर्शन दुपारी जेवण करून पुन्हा स्थळ दर्शन रात्री हैद्राबाद हॉटेल मुक्काम,
दिवस ५ : हैद्राबाद हुन कुरवपूर करिता प्रस्थान कुरवपूर येथे कृष्णा नदीत बोटीने श्रीपाद वल्लभ दत्त दर्शन करून हैद्राबाद करिता प्रस्थान,
दिवस ६ : सकाळी लवकर श्रीशैल्यम ( १२ ज्योतिर्लिंग पैकी एक ) करिता प्रस्थान आगमन धर्मशाळा मुक्काम,
दिवस ७ : सकाळी इतर स्थळ दर्शन करून / जेवण करून हैद्राबाद प्रस्थान आगमन रात्री हॉटेल मुक्काम,
दिवस ८ : सकाळी नास्ता करून रामोजी फिल्मसिटी प्रस्थान सर्व बघून रेल्वे स्टेशन आगमन रात्री हैद्राबाद रेल्वे स्टेशन हुन रात्री २२७३१ मुंबई एक्सप्रेसने कल्याण करिता प्रस्थान,
दिवस ९ : दुपारी १२ वा. कल्याण येथे सुखरूप आगमन ..
✔️ सहल खर्च समाविष्ट :
▪️डबल / ट्रिपलं बेड आधारित रात्रीचे हॉटेल निवास व्यवस्था..
▪️वातानकुलीत २ x २ वाहनाद्वारे पर्यटन स्थळ प्रवास ..
▪️संपूर्ण जेवण हॉटेल मध्ये आयोजित करण्यात येईल..
▪️दररोज एक पाण्याची बॉटल..
▪️ प्रत्येक यात्रेकरूला एक टोपी आणि एक साईड बॅग..
▪️रेल्वे बुकिंग मिळण्यासाठी लवकर आपली सीट बुक करा..
✖️ सहल खर्च समाविष्ट नसेल :
▪️ रेल्वे आणि विमान प्रवास खर्च..
▪️एन्ट्री फि, होडी, सफारी आणि दर्शन पावती खर्च अतिरिक्त असेल..
अधिक माहिती साठी संपर्क साधा..
श्री अष्टविनायक ट्रॅव्हल्स..
कल्याण..
9323780880, 7666725151, 9029080880.
!! श्री स्वामी समर्थ !!
राजस्थान दर्शन : मेवाड / मारवाड
जयपूर - पुष्कर - अजमेर - बिकानेर - जोधपूर - जैसेलमर - उदयपुर - हल्दीघाटी - चित्तोड
सहल दिनांक : १९ डिसेंबर ते २९ डिसेंबर
सहल खर्च : प्रत्येकी ₹. ३३,५००/- रेल्वे तिकीट एक्सट्रा
"राजपाठ, राजवाडे आणि राजसी स्वागत, वाळवंटाच्या रेताड वाळूत दडलंय इतिहासाचं सोनं!"– हेच आहे खरे राजस्थान!"
राजस्थान पर्यटनाची माहिती
राजस्थान हे भारतातील पर्यटनासाठी सर्वोत्तम राज्यांपैकी एक मानले जाते. इतिहास, कला, संस्कृती, वाळवंटी प्रदेश, आणि राजवाड्यांचा वारसा यामुळे राजस्थान हा पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.
राजस्थानची वैशिष्ट्ये:
वास्तुकला : ऐतिहासिक किल्ले, महाल, आणि हवेली हे राजस्थानचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
संस्कृती : पारंपरिक नृत्य, संगीत, उत्सव, आणि रंगीबेरंगी वस्त्र ही येथील संस्कृतीची खासियत आहे.
खाद्यपदार्थ : दाल बाटी चूरमा, घेवर, आणि केर-सांगरी यांसारखे स्थानिक पदार्थ चाखण्यासारखे आहेत.
वाळवंट अनुभव : जैसलमेर आणि बीकानेर येथील वाळवंट सफारी हे एक आगळावेगळा. अनुभव देते.
मुख्य पर्यटनस्थळे:
१. जयपूर (गुलाबी शहर)
आमेर किल्ला, हवा महल, सिटी पॅलेस, जंतर मंतर..
राजस्थानी हस्तकला आणि पारंपरिक वस्त्र खरेदीसाठी प्रसिद्ध
२. उदयपूर (व्हाईट सिटी, तलावांचे शहर)
पिछोला तलाव, सिटी पॅलेस, फतेहसागर तलाव..
सहेलीयों कि बाडी, सिटी पॅलेस, खुप बघण्यासारखा आहे..
तलावातील नौकाविहार आणि राजस्थानी लग्नसोहळ्यासाठी प्रसिद्ध..
३. जैसलमेर (गोल्डन सिटी)
सोनार किल्ला, गडीसर तलाव, सॅम वाळवंट..
वाळवंटी सफारी आणि राजस्थानी नृत्याच्या सादरीकरणासाठी प्रसिद्ध..
४.बिकानेर
हे राजस्थानातील एक ऐतिहासिक शहर असून, वाळवंटातील त्याचे किल्ले, हवेल्या आणि उंट फार्मसाठी प्रसिद्ध आहे.
जुनागढ किल्ला, बिकानेरी भुजिया आणि मिठाई – खाद्यप्रेमींसाठी खास!
५. जोधपूर (ब्लू सिटी)
मेहरानगड किल्ला, उम्मेद भवन पॅलेस, जसवंत ठाडा..
निळ्या घरांनी सजलेले शहर..
६. पुष्कर
ब्रह्मा मंदिर, पुष्कर तलाव, उंट मेळा..
धार्मिक पर्यटनासाठी आणि स्थानिक बाजारासाठी प्रसिद्ध..
७. चित्तोडगड
चित्तोडगड किल्ला, विजय स्तंभ, पद्मिनीचा महाल..
शौर्य आणि बलिदान यांचा इतिहास सांगणारे स्थळ..
प्रसिद्ध उत्सव :
डेजर्ट फेस्टिव्हल (जैसलमेर): वाळवंटात होणारा उत्सव.
पुष्कर उंट मेळा: उंट बाजार आणि सांस्कृतिक कार्यक्रम..
तेजस उत्सव: राजस्थानी नृत्य आणि संगीताचा उत्सव..
भेट देण्यासाठी उत्तम काळ:
ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी राजस्थान फिरण्यासाठी सर्वोत्तम आहे. यावेळी हवामान सुखद आणि थंड असते.
राजस्थान हा भारताचा सांस्कृतिक ठेवा असून, इतिहास, निसर्ग, आणि आधुनिकतेचा उत्कृष्ट संगम येथे पाहायला मिळतो.
✅ सहल खर्च समाविष्ट :
▪️डबल / ट्रिपलं बेड आधारित रात्रीचे हॉटेल निवास व्यवस्था..
▪️वातानकुलीत २ x २ वाहनाद्वारे पर्यटन स्थळ प्रवास ..
▪️उंट सफारी, जैसलमेर चौकीदानी एन्ट्री फी, जैसलमेर कल्चरलं शो दर्शन पावती खर्च..
▪️घरगुती जेवण व्यवस्था, किचन आणि आचारी बरोबर असणार..
▪️दररोज एक पाण्याची बॉटल..
▪️ प्रत्येक यात्रेकरूला एक टोपी आणि एक साईड बॅग..
▪️रेल्वे बुकिंग मिळण्यासाठी लवकर आपली सीट बुक करा..
❎ सहल खर्च समाविष्ट नसेल
▪️ रेल्वे आणि विमान प्रवास खर्च..
▪️वैयक्तिक शॉपिंग किंवा इतर कामासाठी वाहन खर्च..
▪️बोटिंग खर्च, जीप सफारी..
त्रिदळी यात्रा : दिल्ली - आग्रा- मथुरा - वृन्दावन - गोकुळ - आग्रा - फतेहपूर सिक्री
सहल यात्रा दिनांक : ०३ डिसेंबर ते ११ डिसेंबर
सहल यात्रा खर्च : प्रत्येकी ₹. १९,५००/- फक्त..
दिवस १ : कल्याण – दिल्ली राजधानी एक्सप्रेसने दिल्ली करिता प्रस्थान सायं ४.१५ वा. कल्याण रेल्वे स्टेशन वरून दिल्ली करिता प्रस्थान ..
दिवस २ : सकाळी निझामुद्दीन रेल्वे स्टेशन वर सकाळी १० वाजता आगमन लक्झरी बसने दिल्ली हॉटेल आगमन - हॉटेलमध्ये चेक इन दिल्ली येथील अक्षरधाम मंदिर दर्शन / करोल बाग खरेदी करून दिल्ली हॉटेल मुक्काम येथे रात्रभर मुक्काम
दिवस ३ : सकाळी नाश्ता करून दिल्ली करिता प्रस्थान इतर स्थळ दर्शन करून, रात्रौ दिल्ली हॉटेलमध्ये मुक्काम.
दिवस ४ : सकाळी नाश्त्या नंतर मथुरा करिता प्रस्थान मथुरा स्थळ दर्शन , वृन्दावन स्थळ दर्शन वृदावन हॉटेल मुक्काम..
दिवस ५ : सकाळी नाश्त्यानंतर चेक आउट करून गोकुळ दर्शन प्रस्थान दर्शन करून आग्रा करिता प्रस्थान ताज महल / आग्रा फोर्ट स्थळ दर्शन करून आग्रा आगमन मुक्काम..
दिवस ६ : सकाळी नाश्त्यानंतर फतेहपूर सिक्री प्रस्थान स्थळ दर्शन करून सायं ६.३० वाजता राजधानी एक्सप्रेसने कल्याण करिता प्रस्थान..
दिवस ७ : सकाळी १० वाजता कल्याण येथे सुखरूप परत...
✅ सहल खर्च समाविष्ट :
▪️डबल / ट्रिपलं बेड आधारित रात्रीचे हॉटेल निवास व्यवस्था..
▪️वातानकुलीत २ x २ वाहनाद्वारे पर्यटन स्थळ प्रवास ..
▪️घरगुती जेवण व्यवस्था, किचन आणि आचारी बरोबर असणार..
▪️दररोज एक पाण्याची बॉटल..
▪️ प्रत्येक यात्रेकरूला एक टोपी आणि एक साईड बॅग..
▪️रेल्वे बुकिंग मिळण्यासाठी लवकर आपली सीट बुक करा..
❎ सहल खर्च समाविष्ट नसेल :
▪️ रेल्वे आणि विमान प्रवास खर्च..
▪️एन्ट्री फि, होडी, सफारी आणि दर्शन पावती खर्च अतिरिक्त असेल..
संपर्क :
श्री अष्टविनायक ट्रॅव्हल्स.. कल्याण..
९३२३७८०८८०, ७६६६७२५१५१, ९०२९०८०८८०
Phone Pe Number: | +91-9029080880 |
Google Pay Number: | +91-9323780880 |